पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचत आहे. महायुतीचे पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारालाही चांगलाच रंग आला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळत आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी कसबा आणि पर्वती या २ विधानसभा मतदारसंघामध्ये बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुरली मोहोळ शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आमदार असताना देखील भाजपच्या रॅलीला मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
कसब्यात मोठी बाईक रॅली, मुरलीअण्णांच्या विजयाची तयारी
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी कसबा आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुरलीअण्णांसोबत सहभागी झालो. बाईक रॅली… pic.twitter.com/h39FB9dzk8
— Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) (@DheerajGhate) May 3, 2024
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्या या बाईक रॅलीला जनतेने उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. यावेळी स्थानिकांनी मुरली मोहोळ यांचे जल्लोषात स्वागत केले. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-“२ वेळा बोललात, तिसऱ्यांदा बोलला तर करारा जवाब मिलेगा”; सुप्रिया सुळेंचा इशारा
-पुण्यातील वाहतूकीत ४ मे पासून महत्वाचे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, कोणता पर्यायी मार्ग?
-“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार