पुणे : लोकसभा निवडणुकीत प्रचारसभा, रॅलींना चांगलाच रंग चढला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारालाही चांगलाच रंग चढला आहे. मोहोळ यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली आहे. ‘संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत आहे’, असे रामदास आठवल बुधवारी म्हणाले आहेत.
“मोहोळांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. कोरोनानंतर त्यांनी विकास कामांना गती दिली. त्याबरोबर शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची प्रतिमा आहे, पुणेकरांनी त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे”, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
“इंडिया आघाडीकडून संविधान बदलाची उलटसुलट चर्चा केली जात आहे. लोकशाही धोक्यात आली आहे’ असा प्रचार सुरु आहे. लोकशाही जर धोक्यात आली असती तर पंतप्रधान मोदी मत मागण्यासाठी देशभर फिरले असते का? संविधानावर देश चालणार आहे. विरोधकांनी कितीही बाता मारल्या तरी संविधानाप्रमाणेच देशाला चालवावे लागेल. देश म्हटला की,संविधानाची भूमिका, गीता, कुराण बायबल असे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत. याचा आदर सर्वांना आहे”, असं म्हणत रामदास आठवलेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…
-‘…मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी मोदींना का यावं लागलं?’; वाघेरेंचा बारणेंना खोचक सवाल
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’
-पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान