Pooja Sawant : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. पूजाने ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर पूजा आता ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाली आहे. सध्या पूजा सावंत चव्हाणने ऑस्ट्रेलियामध्येच असून, ती आता परदेशात भटकंती करताना दिसत आहे.
पूजा ऑस्ट्रेलियामध्ये गेली असली तरीही पूजा भारताला तसेच महाराष्ट्राला विसरलेली नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त पूजाने मराठमोळ्या अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला आहे. तिने आता ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी देखील एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महाराष्ट्र दिन अवघ्या महाराष्ट्रातील जनतेने उत्साहात साजरी केला. पूजा सावंत हिने देखील तिच्या ऑस्ट्रेलियातील घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे.
View this post on Instagram
“सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी खूप इच्छा होती की मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी. लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टिमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यातील मनोजने (आमचे स्पॉटदादा) ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली. त्यानंतर अगदी काळजीपूर्वक मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला घेऊन आले. फायनली आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ऑसट्रेलियाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज”, असं पूजाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार
-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं
-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार