पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रातील नेते हजेरी लावताना दिसत आहेत. त्यातच आता मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. त्यातच बारणेंच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत कविता करत प्रचाराला चार चाँद लावले आहेत.
‘ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचे नाव आहे श्रीरंग आप्पा बारणे, नारा, सारा, तारा अन् बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसचे कसे वाजवणार बारा’ हे ही आठवलेंनी कवितेतून सादर केलं. रामदास आठवलेंनी थेट श्रीरंग बारणे यांचे आपल्या कवितेतून कौतुक केले आहे. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केल्याचं पहायला मिळालं आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी सभा घेतली. पिंपरी-चिंचवडमध्ये ही सभा पार पडली. रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीतील कवितेतून बारणेंचा प्रचार केला आहे. ‘अब की बार, फिरसे मोदी सरकार’ असा नारा भाजपने दिलाय. हाच धागा धरून मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी स्वतःसाठीचं एक नारा देऊन टाकला. ‘अब की बार, फिरसे अप्पा बारणे खासदार’ असा नारा बारणेंनी भर सभेत दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार
-Lok Sabha | ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
-मोदींना साथ देणारा नेत्याची गुगली, म्हणाले ” मी शरद पवारांना रोज भेटतो आत्ता…”
-“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार