पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.
“गेली ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप अमोल कोल्हे करू लागले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं”, असं खुलं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर कांदाभावावरुन धारेवर धरलं होतं. त्यावर उत्तर देताना आढळरावांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले होते?
दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. ‘काहींनी १५ वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे’, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळराव पाटलांवर केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha | ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
-मोदींना साथ देणारा नेत्याची गुगली, म्हणाले ” मी शरद पवारांना रोज भेटतो आत्ता…”
-“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार
-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन