पुणे : महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणाऱ्या आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री खूप चांगली आहे’, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. आठवलेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
“हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती तशीच आमची देखील आहे. भविष्यात अजून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी करेन. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत शरद पवार राहिले, याबाबत भविष्यात विचार करु” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
‘मला तिकीट दिलं नाही तरीदेखील मी भाजपसोबतच आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्की मिळाली असती. आपली राज्यसभा २०२६ पर्यंत आहे. त्यांनंतर देखील मिळेल. जागा मिळाली नसली तरी मी महायुतीसोबत आहे. माझ बिनशर्त पाठिंबा नाही. आमची फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहे. आरपीआयला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत १० जागा देण्याचं मान्य केलं आहे. केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल”, असे रामदास आठवले म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार
-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष