पुणे : महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पुण्यात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र लुटला जात आहे आणि लुटारुंच्या हाती महाराष्ट्र दिला जात आहे’, अशी टीका विरोधकांवर केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरे आणि मी एकत्र काम केलं आहे. आमच्याच त्यावेळी कोणतेही मतभेद नव्हते. आता ते लयलूट केलं म्हणून म्हणत असेल तर त्यांनी कुठे आणि कधी लयलूट झाली हे सांगावं. सोबतच निवडणुकीच्या दिवसांत अनेकजण अनेकांवर टीका करत असतात. निवडणुकीच्यावेळी कोणतीही टीका किंवा वक्तव्ये गांभीर्याने घ्यायची नसतात, असं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं, हे मला आठवतंय. निवडणुकीच्या काळात असे आरोप होतात”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर भाष्य केले. राज्यातील जनतेला उष्णतेपासून बचाव करावा, काळजी घ्यावी, असा आवाहनही अजित पवारांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आढळराव पाटील फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत’; अमोल कोल्हेंचा आरोप
-“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली, म्हणून…”; अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
-पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली
-वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प पथदर्शी ठरणार – मोहोळ
-“राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम असं मानणार्यांमध्ये हा संघर्ष”- प्रकाश जावडेकर