Summer : गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. संपूर्ण राज्यासह पुण्यातही उन्हाचा चटका बसत आहे. वाढत्या तापमानामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. राज्यात या उन्हामुळे उष्णाघाताचे रुग्णही सापडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.
राज्यात उष्माघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आपली काळजी कशी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत. उष्माघाची लक्षणे काय आहेत हे आधी आपण जाणून घेऊया….
उष्मघाताचे लक्षणे
मळमळ, उलटी, हाता-पायांना गोळे येणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, डोळे लाल होणे, घाम न येणे, डीहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
काय काळजी घ्यावी?
-उन्हात फिरत असाल तर टोपी घालणे आवश्यक आहे.
-महत्वाचे काम नसेल तर उन्हात फिरणे टाळा, दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो घरात रहा.
-शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पित राहा.
-शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड शॉवर खाली अंघोळ करावे, किंवा अंघोळीसाठी थंड पाणी वापारावे.
-डीहायड्रेशन होऊ देऊ नये, पाणी पित राहावे.
-लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे.
काय करु नये?
-अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
-थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे टाळावे.
-थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
महत्वाच्या बातम्या-
-हडपसरमध्ये आढळराव पाटलांची सरसी, रॅलीला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद
-“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर
-मावळात ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारांच्या गर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली
-Shirur | बारामतीची पुनरावृत्ती शिरूर लोकसभेत; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढली