पुणे : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौत्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी २९ एप्रिल शेवटचा दिवस होता. आता या टप्प्यातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचाराला चांगलाच वेग आल्याचं दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, माळवाडी, १५ नंबर, साडेसतरा नळी या परीसरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत समर्थन दिले आहे.
हडपसरमधील हजारो नागरिकांनी आढळरावांच्या या भव्य रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. आढळराव पाटलांचे ठिकठिकाणी औक्षण केले आणि त्यांचे स्वागत केले. यावेळी महायुतीचाच विजय होणार याची ग्वाही देखील त्यांनी दिली. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
हडपसरमधील या रॅलीला महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर व महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर
-मावळात ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारांच्या गर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली
-Shirur | बारामतीची पुनरावृत्ती शिरूर लोकसभेत; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढली