पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ, शिरुर लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.
“पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे. मोदींचं म्हणणं खरं आहे. आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे, लोकांचे संसार करणे कठीण झाली आहे, त्यासाठी १०० वेळा अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अडचणी असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझं कर्तव्य आहे”, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना उत्तर दिले आहे.
“लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. जर ती टीका चुकीची असेल तर तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केलं. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे”, असेही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारांच्या गर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली
-Shirur | बारामतीची पुनरावृत्ती शिरूर लोकसभेत; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढली
-राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात ‘यलो अलर्ट’ जारी
-AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद