पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणार माणूस असे आहे. मात्र बारामती लोकसभेच्या आणखी एका अपक्ष उमेदवाराला या निवडणुकीसाठी तुतारीचे चिन्ह देण्यात आले आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे.
शिरुरमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांची चिंता चांगलीच वाढली आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे.
शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं आहे. या चिन्हांतील साम्य पाहून मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. परिणामी मतांवर याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात ‘यलो अलर्ट’ जारी
-AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
-‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात’; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेवर ओवैसींचं प्रत्युत्तर
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ‘भटका आत्मा’ म्हणून केला उल्लेख