पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे’, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवाराचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
“काही भटके आत्मे आहेत. स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते. ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते. महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही तर, स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या भटक्या आत्म्याने १९९५ च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि २०१९ मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता”, असं म्हणत नरेंद्र मोदी शरद पवारांना भटकता आत्मा म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी हे आज पुण्यातील सभेनंतर पुणे येथिल राजभवनात मुक्काम करणार आहेत. राजभवन परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे उद्या धाराशिव आणि माळशिरस येथे जाहीर सभा घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
-पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं
-पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच पुणे मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप