पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुणे शहरातील रेस कोर्स मैदानावर प्रचारसभा सुरु आहे. सध्या सभा सुरु आहे. आणि पंतप्रधान मोदी हे आज शहरातील राजभवनामध्ये मुक्कामी असणार आहेत. मोदी पुण्यात पहिल्यांदा मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची जाहीर सभा ही पुण्यात पार पडणार आहे. या जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्काम करणार आहेत. रात्री या परिसरातील पोलीस बंदोबस्तदेखील वाढवला जाणर असल्याची माहिती आहे.
पुण्यातील आजच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी हे उद्या धारशीव आणि माळशिरसमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. उद्याच्या या आयोजित सभांमुळे नरेंद्र मोदी आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून राजभवनामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.आजच्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गाने राजभवनाकडे रवाना होतील त्या मार्गावर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!
-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”
-‘…म्हणून आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही’; प्रकाश आंबेडकरांनी सागितलं नेमकं कारण