Sairat : अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटाला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत ११० करोड रुपयांचा व्यवसाय करणारा हा पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाला आठ पूर्ण झाली यानिमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच सैराटच्या सेटवरील काही जुने फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्री जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सैराट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रिंकूला तिच्या उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटाचे कौतुक फक्त भारतातच नाही तर जगभरात करण्यात आले होते. या सिनेमातील गाणी असो वा चित्रपटातील डायलॉग सर्वांनाच भरभरून प्रेम मिळेल. या चित्रपटाचे बॉलीवूडकरांकडूनही खूप कौतुक झाले.
View this post on Instagram
सैराट चित्रपटाला आठ वर्ष उलटली असली तरी देखील आजही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आजही हा चित्रपट अगदी आवडीने पहिला जातो, तसेच चित्रपटातील गाण्यांना देखील भरभरून प्रेम दिले जाते. ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लाडक्या आर्चीने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अशातच आता चाहत्यांमध्ये ‘सैराट २’ची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येईल हे येणार काळच सांगेल.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!
-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”
-‘…म्हणून आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही’; प्रकाश आंबेडकरांनी सागितलं नेमकं कारण
-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले