Summer Food : उन्हाळ्यात जास्त भूक लागत नाही. आपण सतत पाणी पितो. जास्त पाणी पिल्याने देखील भूक कमी लागते. हलक्या अन्नाचा आहार सर्वांना घ्यावा वाटतो. उन्हाळ्यात आपल्या शरीराला हलकं अन्न खाणं फायदेशीर असतं. आपल्याला प्रत्येक वेळी डाळ-भात खायला आवडत नाही आणि पचन व्यवस्थित होण्यासाठी काही तरी चांगलं पण हलकं खावं असं आपल्याला वाटतं.
अनेकदा तुम्ही ऐकले असेल की, या काळात पुरी-पराठेसोबत खाण्यासाठी काहीतरी हलके पदार्थ तयार केले जातात जेणेकरून अपचनाची समस्या वगैरे होऊ नये. व्यवस्थित पचन होतील अशा काही पदार्थांबद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत, जे पदार्थ तुम्हाला खूप चविष्ट लागतील आणि त्याचबरोबर हलक्या असल्याने पचन बिघडणार नाही.
कच्च्या कैरीची डाळ आणि भात
सध्या उन्हाळा सुरु आहे म्हणजे आंब्याचा सीझन सुरु आहे. आंब्याचा हंगाम उन्हाळ्यात आला की कच्च्या कैरीची डाळ खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो.
आमरस-पुरी
उन्हाळ्यातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे आमरस-पुरी ही एक गुजराती डिश आहे जी संपूर्ण भारतभर आनंदाने खाल्ली जाते. जरी बरेच लोक गोड आमरस सोबत पुरी देखील खातात, परंतु आम्ही येथे आमरस कढीची रेसिपी सांगणार आहोत.
दही-भात
उन्हाळ्यातील सर्वोत्तम आणि शरीराला थंडावा देणारे जेवण म्हणजे दही भात. उन्हाळ्यात अनेकांना ते खायला आवडते.
महत्वाच्या बातम्या-
-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”
-‘…म्हणून आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही’; प्रकाश आंबेडकरांनी सागितलं नेमकं कारण
-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले
-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ