पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या चार मतदारसंघातील महायुतीच्या उमेगदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत. शिरूर लोकसभेतील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांचा ही मोदी प्रचार करणार आहेत. त्यामुळेच शिवाजीराव आढळराव पाटलांच्या दृष्टीने आजची मोदींची ही सभा महत्वाची आहे.
अमोल कोल्हे यांनी २०१९च्या लोकसभेत आढळरावांना पराभव पत्कारावा लागला होता. आता त्याचा वचपा काढण्यासाठी आढळराव उत्सुक आहेत. यासाठी अजित पवारदेखील मोठी ताकद देताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीव आज पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यावर बोलणार, हे त्यांनाच माहिती आहे. पण सभा जय्यत होणार आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची आयोजित केलेली आहे त्यासाठी शहरी, ग्रामीण भागातील नागरिक उत्सुक आहेत. या सभेला मोठी गर्दी होणार आहे. शिरुर मतदार संघातील सगळ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्ते मोदींच्या सभेसाठी येणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार आहेत, अशी माहितीही आढळराव पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले
-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ
-‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार