पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. काही ठिकणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. राज्याच्या राजकारणात २०१९मध्ये मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सरकार कोसळलं लगेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले. या दरम्यान काही गुप्त बैठका होत होत्या. या बैठकींचा अजित पवारांनी आजच्या भाषणात उल्लेख केला.
“२०१४ देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सत्ता स्थापन केली. २०१९ साली सत्तेत आमच्या साहेबानी सांगितलं शिवसेना असेल तर मी अजिबात येणार नाही. अमित शाह म्हणाले आम्ही शिवसेनेला सोबत घेणार आहोत. २०१९ ला दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अमित शाह म्हणाले आम्हाला जुना अनुभव चांगला नाही पण अजित तू शब्दाचा पक्का आहेस. मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारसाहेबांवर चिडले. विधानसभा अध्यक्षावरून पुन्हा बैठक फिस्कटली आणि साहेब पुन्हा म्हणाले भाजपसोबत चर्चा करा. जयंत पाटील म्हणाले तुम्ही ‘वर्षा’वर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. पहाटे शपथविधी नाही नंतर सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, असं अजित पवारांनी शपथविधीबाबत सांगितलं आहे.
मी काय दिवसांपूर्वी धरणाबद्दल बोललो होतो. पण त्यामुळे माझं वाटोळं झालं ना राव… आता मी शब्द मी जपून वापरतो. काम करणाऱ्या लोकांकडून चुका होतात. कार्यकर्त्यांना सांगताना देखील काही जण म्हणतात अजित पवार दम देतायेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलतोय कुणाच्या पोटात का दुखावं? असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित
-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी
-Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..