बारामती: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील काही हायव्होल्टेज लढतींमध्ये बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथे महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) असा सामना होतोय. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आता बंजारा समाजाची ताकद उभी राहताना दिसत आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ॲड. पंडित भाऊ राठोड (PanditBhau Rathod) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे आम्ही प्रभावित व उत्साहित आहोत. देशामध्ये नरेंद्रभाई मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात मजबूत करण्यासाठी कायम महायुतीच्या पाठीशी आहोत. बारामती मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गढ़ मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढेल” असा विश्वास यावेळी पंडित भाऊ राठोड यांनी व्यक्त केला.
गोरबंजारा समाजामध्ये देशाच्या स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य वाढण्याचा विश्वास, यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव पंडितभाऊ राठोड, इंटरनॅशनल गौरबंजारा प्रगती फाउंडेशनचे राहुल चव्हाण, उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल नाईक, राहुल चव्हाण, पुणे उपाध्यक्ष सुबोध पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल चव्हाण, संघटक आदेश जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा. राष्ट्रीय सचिव मंदार दोशी, अतुल भोसले यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.