Ice Facial : सध्या प्रचंड प्रमाणात उन्हाळा आहे. या उन्हाळ्यात अनेकांच्या आरोग्यावर, त्वचेवर परिणाम झाले आहेत. अनेक जण आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ लावतात. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहरा मऊ होतो आणि थंडावा राहतो. बर्फ चेहऱ्याला लावल्याने थेट सुर्यप्रकाशाचा चेहऱ्यावर जास्त परिणाम होत नाही आणि आराम मिळतो. जर तुम्ही चेहऱ्यावरील टॅनिंगच्या समस्येचा सामना करत असाल, तरीही हा एक प्रभावी उपाय आहे. दिवसातून एकदा तरी बर्फ वापरा फायदेशीर ठरेल.
जर तुम्हाला थ्रेडिंग (ऍब्रोज) करताना खूप वेदना होत असतील, तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. थ्रेडिंग करण्यापूर्वी भुवयांवर आणि आजूबाजूला बर्फ फिरवल्याने थ्रेडिंगकरताना जास्त त्रास होत नाही.
तुम्हाला जर डार्क सर्कलच्या समस्येपासून दूर रहायचे असेल तर काकडीचा रस आणि गुलाब पाणी बर्फाच्या क्यूब ट्रेमध्ये ठेवून त्याचा बर्फ तयार झाल्यानंतर तो बर्फ चेहऱ्यावर आणि डार्क सर्कलच्या जागी लावल्यास डार्क सर्कल लवकर दूर होतात. चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण बर्फ वापरून डोळ्याभोवतीचे काळी वर्तुळे दूर करु शकतो.
चेहऱ्यावर बर्फ लावणे हे जितके प्रभावी आहे तितकेच ते सुरक्षित देखील आहे. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही फळांच्या रसाचा बर्फ करू शकता आणि नंतर ते चेहऱ्यावर लावू शकता. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. याशिवाय, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करण्यासाठी बर्फ हा उपयुक्त ठरतो.
आइस फेशियलमुळे आपल्या त्वचेला चमक तर मिळतेच पण याशिवाय आपली त्वचेवरील डागही निघून जातात. हे खूप सोपे आणि प्रभावी आहे. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील, तर तुम्ही कडुलिंब किंवा पुदिन्याची पाने उकळून आईस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवू शकता. यामुळे चेहऱ्यावरील मुरम गायब होतील आणि चेहरा मऊ, चमकदार दिसेल.
महत्वाच्या बातम्या-
-“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…
-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?
-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब
-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद