Krishna Mukherjee : बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींना काम करताना अनेक अडचणींचा सामोरं जावं लागतं. या ग्लॅमरस जगात चांगल्या वाईट घटना घडत असतात. महिला अभिनेत्रींंसाठी हे क्षेत्र सुरक्षित नसल्याची चर्चाही अनेकदा होत असते. त्यातच अनेक अभिनेत्री त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग सांगत असतात. यामध्ये छोट्या-मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींनी असे अनेक प्रसंग सांगितले आहेत, त्यातच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने आपल्यावर बेतलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“निर्मात्याने तिला मेकअप रूममध्ये बंद केले होते. कृष्णाने लिहिले की, “त्यांनी मला एकदा माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले होते. मला बरे वाटत नव्हते आणि मी शूट न करण्याचा निर्णय घेतला. ते मला माझ्या कामाचे पैसेही देत नव्हते आणि मी अस्वस्थ होते. माझ्या मेकअप रुमचा दरवाजा जोरजोरात वाजवत होते. असं वाटलं की ते आता दरवाजा तोडून देतील. त्यावेळी मी माझे कपडे बदलत होती. निर्मात्यांनी मला ५ महिन्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. ही रक्कम खूपच मोठी आहे. मी दंगल चॅनेलच्या ऑफिसमध्ये ही गेले. मात्र, त्यांनी माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष केले”, असे कृष्णाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे.
View this post on Instagram
‘ये है मोहब्बतें’ या सर्वात लोकप्रिय डेली सोपमधून अभिनेत्री कृष्णा मुखर्जीला ओळख मिळाली. मनोरंजन क्षेत्रात तिने एक दशकांहून अधिक काळ काम केले असून ‘नागिन ३’, ‘कुछ तो है: नागिन एक नए रंग में’, ‘शुभ शगुन’ आदी मालिकांमध्ये काम केले. कृष्णाने तिच्या या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘शुभ शगुन’च्या सेटवर आलेला हा धक्कादायक अनुभव आला असल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?
-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब
-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद
सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…
-‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’; चाकणकरांचा सुळेंना टोला