पुणे : राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या शिरुर मतदारसंघातील लढत ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्हीही उमेदवारांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. शिरुरमध्येही बारामतीप्रमाणेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराला रंग चढला आहे.
या प्रचारासाठी राज्यातील तसेच देशातील नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडत आहेत. या प्रचार सभांमधून उमेदवार एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. कोणता उमेदवार मतदारसंघात कमी संपर्कात आहे आणि कोणता जास्त संपर्कात आहे यावर जास्तीचा भर देत आहेत. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षात मतदारांसोबत संपर्क देण्यात कमी पडल्याचे वास्तव आहे. ही खंत राष्ट्रवादीच्या फुटी पूर्वी त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत होते. यावरुन कोल्हे यांचे मतदारसंघात राजकीय वजन खालावल्याची चर्चा होती.
सध्याच्या प्रचारात देखील मतदारांमधून हाच प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेत प्रश्न मांडणारा मी खासदार असल्याचे कोल्हे सांगत असले तरी हा राजकीय प्रोपोगंडा मतदारसंघात फिट होत नाही. या उलट पराभूत झाल्यापासून शिवाजीराव आढळराव पाटील हे सतत लोकांमध्ये मिसळून राहिल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय आढळराव पाटील नेहमी हजेरी लावताना दिसले आहेत. आढळरावांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालूच ठेवल्या. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांकडे भेटी घेऊन रखडलेले प्रश्न मांडत होते. भविष्यातील राजकीय चित्र काय असेल याबाबत साशंकता असताना देखील आढळराव पाटील यांनी आपले काम चालूच ठेवल्याचे दिसत होते. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांचेच नाव राजकीय जाणकारांच्या मधून देखील चर्चेत होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब
-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद
सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…
-‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’; चाकणकरांचा सुळेंना टोला
-…अन् ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे पडले अजितदादांच्या पाया; सर्वत्र होतेय चर्चा