पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे महायुतीची सभा पार पडली. या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केलेली आहे. ‘मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रकार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं’, अशी टीका करत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“आजवर जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. याही निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देताल, तसेच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले की, दादा तुम्ही केलेली काम आताच्या खासदारांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत. मी केलं, मी केलं. आहो, मी बारामतीमधील सर्व इमारती बांधल्या आहेत. मी हे केलं, हे केलं. तर मग भोर,वेल्हा या तालुक्यामध्ये काय काम केली. हे पण सांगाव? पण त्यांनी या दोन्ही ठिकाणी काहीच काम केल नाहीत.”
“एमआयडीसीच्या मुद्द्यावरती 2014 ला मत मागितली. मात्र हे एमआयडीसीच काम पूर्ण केलं नाही. तरीदेखील तेच लोक 2019 ला मत मागायला आले होते आणि आताही मत मागत आहेत. मी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने मत मागता आहेत? तुम्ही लोकांनी त्यांना १५ वर्ष निवडून दिले. पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.पण आज मी तुम्हाला म्हणतो की, यांना (सुनेत्रा पवार) एकदा निवडून द्या, त्यांचं काम नक्कीच दिसून येईल’, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद
सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…
-‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’; चाकणकरांचा सुळेंना टोला
-…अन् ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे पडले अजितदादांच्या पाया; सर्वत्र होतेय चर्चा
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार