पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आता प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी 29 एप्रिल रोजी रेस कोर्स मैदानावर मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक देखील असून मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र सुरू असलेली वादांची मालिका थांबताना दिसत नाही. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून कॉंग्रेसमध्येच वाद झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे यांची कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली तर आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंची सभा कोथरूडमध्ये होऊ नये, असा काही काँग्रेसच्या नेत्यांची मागणी असल्याचं समोर आलं आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्ताने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड, शो, मेळाव्यांचे नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने काँग्रेस भवनात गुरूवारी रात्री काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवरून काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. सभा झालीतच तर कोथरूड विधानसभेवर देखील ठाकरे गटाकडून दावा केला जाईल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर याचा परिणाम होईल, असे सांगत काही पदाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…
-‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’; चाकणकरांचा सुळेंना टोला
-…अन् ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे पडले अजितदादांच्या पाया; सर्वत्र होतेय चर्चा
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार