बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. महायुतीच्या उमेदवा सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. महायुतीकडून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुनेत्रा पवार यांचा विजयी निश्चित असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. मात्र आता अजित पवार यांनी मताधिक्याचा आकडाच सांगितला आहे.
“बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित आहे. सुनेत्रा पवार बारामतीमध्ये लाखाच्या फरकानं जिंकणार. मी जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा पुर्ण विश्वासानेच उतरतो. मी निवडणुकीत जिंकण्याकरता उतरतो, हरण्याकरता नाही”, असा आत्मविश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
बारामती निवडणुकीबाबत अजित पवारांचा विश्वास व्यक्त केला आहे. बारामती लेकसभा मतदारसंघातली चुरस दिवसेंदिवस आधिकच वाढत चालली आहे. बारामतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंब विभागलेले दिसत असून एकाच कुटुंबातील २ सदस्य आमने सामने आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. येत्या निवडणुकीत पवार कुटुंबातील कोणता सदस्य बाजी मारेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी
-पुणे तिथे काय उणे! नोकरीला लाथ मारत, बॉसला दिली खुन्नस; ढोला-ताशा वाजवत जल्लोषात कंपनीतून एक्झिट
-‘केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार’; सुनेत्रा पवारांचं जनतेला आवाहन
-“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”