पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी परिसरात सुनेत्रा पवार यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याचं आवाहन केलं आहे.
“जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजित पवार नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी अजितदादा खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभे आहेत. त्याचवेळी माझ्याकडूनही केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून तुमच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल”, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
“केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असेल तर कोणत्याही प्रश्नांची सोडवणुक करणे सहजशक्य होते. देशाचे भवितव्य सुरक्षित हातात रहावे यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी त्यांच्या बाजूने मतदान करणारा खासदार हा आपल्या मतदारसंघातून निवडून जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा भाग आहे. त्यामुळे घड्याळ या चिन्हावर आपण निवडणूक लढवत असून सर्वांनीच हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे. घड्याळयाला अधिकाधिक मतदान करुन निवडून देण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”
-“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”
-‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
-मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज