पुणे : सध्याच्या काळात नोकरी मिळणं अनेकांना कठिण जात आहे. त्यातच नोकरी मिळाली तर ती टिकवणं सोपं राहिलं नाही, असं बोललं जातं. आपल्या सर्वसामान्य गरजा भागवण्यासाठी घर, संसार आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दररोज ८ तासांची नोकरी करणं भाग पडतं. काहीजण यात खूष असतात तर काहींना मन मारून असमाधानी असतानाही नोकरी करावी लागते.
अशातच काही वेळेस वरिष्ठांचे बोलणे ऐकावे लागते. काहीवेळा अपमान सहन करुनही नोकरी टिकवावी लागते. पण एका युवकाने नोकरी सोडल्याचा आनंद धुमधडक्यात साजरा केला आहे. नोकरी सोडल्यानंतर तरुणाने ऑफिससमोर ढोल ताशांचा गरज केला. नोकरी सोडल्याचा जल्लोष व्यक्त केला. डान्स करत करत ऑफिसच्या आवारात आनंद साजरा केला. अनिश भगत या इंस्टाग्राम युजर्सने सोशल मीडियावर अनिकेतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अनिकेतने आपल्या नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे.
View this post on Instagram
मी गेल्या ३ वर्षांपासून कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, गेल्या तीन वर्षात केवळ काही प्रमाणात माझ्या पगारात वाढ झाली. तसेच, कंपनीत काम करताना बॉसकडूनही आदर, सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे, मी नोकरी सोडल्याचे अनिकेतने सांगितले. अनिकेतच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याचे सहकारी मित्र एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ढोल-ताशा आणला होता. कंपनी कार्यालयाबाहेरील हे दृश्य पाहून अनिकेतचा बॉस संतप्त झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच, ढोल-ताशा वाजवत कार्यालयात येऊ पाहणाऱ्या अनिकेतच्या मित्रांना बाहेर ढकलत असल्याचेही दिसते.
महत्वाच्या बातम्या-
-‘केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार’; सुनेत्रा पवारांचं जनतेला आवाहन
-“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”
-“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”
-‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट