पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून मोहोळांचा प्रचारही अगदी जोमाने सुरु आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी पुणेकरांनी मुरलीधर मोहोळांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
“मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुणेकरांनी केलेली गर्दी पाहून लक्षात येते की, पुणेकर फार चोखंदळ आहेत. सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची उतराई म्हणून इतकं ऊन असतानाही पुणेकर रस्त्यावर उतरला. निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता झाली. ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला आहे”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक अर्ज भरताना पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”
-‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
-मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज
-‘अजितदादा म्हणजे विकास कामे करणारे नेते‘; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आठवलेंचा झंझावाती दौरा