पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात ‘डमी उमेदवार’वरुन दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्याच डमी आणि डॅडी उमेदवारावरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिरूर लोकसभेतील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव हे डमी आहेत की डॅडी आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी आढळराव हे डमी उमेदवार आहेत. म्हणून मी त्यांच्यावर फार बोलत नाही, अशी खोचक टीका केली. तर आढळरावांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं म्हणत आढळरावांनी पलटवार केला आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
“भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुर मधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी केला. त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल. असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होत आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.”
ओ डमी उमेदवार, महाराष्ट्रातील माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर बोला!
केंद्र सरकारने फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीची परवानगी देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा गालिचा… pic.twitter.com/Rh095haLj9
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 26, 2024
आढळरावांचं अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर
‘मी डमी नाही तर मी डॅडी उमेदवार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी समजून घ्यावं की डमी ते असतील आणि डॅडी मी आहे. साधारण पाहता अमोल कोल्हेंनी शिरुर मतदार संघातील अनेक गावंं दत्तक घेतली आहे. या दत्तक घेतलेल्या गावात सोयी सुविधा नाही. मात्र मी कोणालाही न सांगता माझ्या संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा करतो आणि गावात सोयी सुविधा देतो. गावं नुसते दत्तक घेऊन होत नाही सोयी सुविधादेखील पुरवाव्या लागतात. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातदेखील मी पाणी पुरवठा करत आहे’, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
-मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज
-‘अजितदादा म्हणजे विकास कामे करणारे नेते‘; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आठवलेंचा झंझावाती दौरा
-‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका
-पुणे मेट्रो धावतेय सुसाट! प्रवासी, उत्पन्न वाढले, पण प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी तक्रार