पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोमाने प्रचार सुरु आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील खळद येथे पुरंदर तालुक्यातील महायुतीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.
‘देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले पाहिजे. तर संविधान बदलले तर फाडून टाकू संविधान कोणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी कधी हसत नव्हते पण त्यांना मी हसवून हसवून राहुल गांधी यांना फसवले’, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 25, 2024
“देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. देशामध्ये महायुतीची ताकद मोठी आहे. नरेंद्र मोदी यांना गरिबीची जाणीव आहे. २४६ कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी नागरिकांना रोजगारासाठी दिला आहे. घराघरापर्यंत गॅस पोहोचवण्याचे काम पंतप्रधानांनी केले देशाला विकासाच्या दिशेनेनेण्यासाठी नरेंद्र मोदी यांची गरज आहे. अजित पवार हे विकासकामे करणारी व्यक्ती आहेत”, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुती च्या उमेदवार सौ सुनेत्रा ताई पवार यांच्या सासवड येथील प्रचार सभेस आज संबोधित केले. pic.twitter.com/OeXO3Ugaq1
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 25, 2024
पुरंदर- हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विक्रम शेलार, सूर्यकांत वाघमारे, जालिंदर कामठे, विराज काकडे, निलेश जगताप, उत्तम घुमाळ, दत्ता झुरंगे, शरद जगताप, स्वप्निल कांबळे, ईश्वर बागमार आदी उपस्थित होते.
‘देश महासत्ता बनवण्यासाठी त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार दिला आहे. सूर्यकांत वाघमारे म्हणाले संविधानाचे रक्षण करण्यासाठी केंद्रात रामदास आठवले यांना मंत्री केले आहे’, असे रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज घिवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका
-पुणे मेट्रो धावतेय सुसाट! प्रवासी, उत्पन्न वाढले, पण प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी तक्रार
-‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य
-सुनेत्रा पवारांच्या सोबतीला सर्जा-राजाची जोडी! बैलगाडीतून मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून स्वागत