पुणे : दौंड तालुक्यातील चौफला येथे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करीत होते. यावेळी अजित पवारांनी आवाहन केले आहे. ‘एकाच ठोक्यात २ तुकडे करण्याची धमक माझ्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा विकास कोण करेल? मोदींच्या विचाराचा खासदार पाठवा’, असे आवाहन अजित पवार यांनी केली आहे.
“राज्यातील मतदारांची भावना होती अजित पवारांनी शरद पवारसाहेबांनी या वयात असं सोडायला नव्हतं पाहिजे. पण भारत देशानेच ज्या नरेंद्र मोदींचे नतृत्व स्विकारले आहे. त्याच नरेंद्र मोदींना आपण साथ देऊन विकास कामांना गती मिळवण्याचे काम करु. मोदींसारखं नेतृत्व दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
“एका बाजूला नरेंद्र मोदी तर एका बाजूला राहुल गांधी तर सांगा देशाचा विकास जास्त कोण करेल? नरेंद्र मोदीच करणार त्यामुळे घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून मतदान करा. निवडणुकीनंतर काही लोक इथं गरम होत आहेत, असं सांगून विदेशात फिरायला जातील पण मी इथे तुमच्या कामासाठी हजर राहणार आहे”, असं म्हणत अजित पवारांना विरोधकांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवारांच्या सोबतीला सर्जा-राजाची जोडी! बैलगाडीतून मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून स्वागत
-‘आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ द्या, उद्याच मंत्री करतो’; अजित पवारांचं वक्तव्य
-‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन
-मावळमध्ये संजोग वाघेरेंना शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरेंची एन्ट्री!
-बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचे हॉट फोटोशूट; नेटकऱ्यांनी केले जोरदार कौतुक!