पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले. मावळ, पुणे, आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे. मावळमधून महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला आहे.
त्यातच संजय वाघेरे या नावाच्या एका उमेदवाराने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवडसह मावळ लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. दोघांच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य असल्याने मतांची विभागणी होऊ शकते यात तीळ मात्र शंका नाही.
निवडणुका म्हटलं की डावपेच आलेच. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अस असलं तरी आता संजय वाघेरे नावाच्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने एकच चर्चा रंगली आहे. दोघांची नावं संजय आणि संजोग अशी असून आडनाव वाघेरे असल्याने दोघांच्या नावांमध्ये काही प्रमाणात साम्य असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार संजय वाघेरे यांचा अर्ज बाद झाला नाही तर आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांची मत विभागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचे हॉट फोटोशूट; नेटकऱ्यांनी केले जोरदार कौतुक!
-हजारोंची गर्दी अन् दिग्गजांची उपस्थिती! आढळराव पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
-उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी
-आढळरावांना लीड किती मिळणार? अजित पवार म्हणतात, ‘मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल!’
-पापाराजी प्रायव्हेट पार्टवर उगाच झूम करतात; नोरा फतेही संतापली