पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगगणात उतरले आहेत. आढळराव पाटलांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे, जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते पाटील, हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांच्यासह महायुतीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आढळराव पाटलांना किती मताधिक्य मिळेल? या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही’, असेही अजित पवारांनी परखडपणे सांगितले आहे. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी
-आढळरावांना लीड किती मिळणार? अजित पवार म्हणतात, ‘मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल!’
-पापाराजी प्रायव्हेट पार्टवर उगाच झूम करतात; नोरा फतेही संतापली
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-“पुण्यात आता ‘मुळशी पॅटर्न’ नाही कर ‘कायद्याचा पॅटर्न’ चालणार”; अमितेश कुमारांचा गुंडांना इशारा