पुणे : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोर फतेही ही कमालीची सुंदर आणि आपल्या डान्सिंगने चाहत्यांना घायाळ करत असते. नोराने एकसे बढके एक आयटम साँगमध्ये डान्स केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पापाराजींसोबत जुळून घेणे कलाकारांची गरज किंवा नाईलाज असतो. काही दिग्गज कलाकार या पापाराजींवर आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
पापाराजी हे अभिनेत्रींच्या मागे फिरताना दिसतात. मग ते जीम बाहेर असो किंवा एखाद्या हॉटेलच्या बाहेर पापाराजी कायमच उपस्थित असतात. अभिनेत्रींना मनाविरुद्ध फोटोला पोझ द्यावी लागते. आता यावर डान्सर नोरा फतेहीने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. नोराने नुकताच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमध्ये पापाराजींवर संताप व्यक्त केला आहे.
“मला असे वाटते की, त्यांनी असे हिप्स पहिल्यांदाच पाहिले आहेत. मला असे वाटते की हेच खरे आहे. मीडिया माझ्यासोबतच नाही तर इतर महिला अभिनेत्रींसोबतही असे करते. ते तुमच्या हिप्सवर झूम नाही करणार कारण ते इतके एक्सायटिंग नाही. पण इतर प्रायवेट पार्ट्सवर ते गरज नसताना झूम करतात. याची खरच गरज नसते. त्यांना नेमके काय करयचे असते ते तुम्हाला माहिती” असे नोरा फतेही म्हणाली आहे.
View this post on Instagram
“दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतात. ते सोशल मीडियावर केवळ अल्गोरिदम सेट करत असतात. देवाने मला खूप सुंदर शरीर दिले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराची जराही लाज वाटत नाही. झूम करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नसेल पण तो वादाचा एक वेगळा मुद्दा आहे. मी कोणाची कॉलर पकडून त्याला धडा शिकवू शकत नाही. पण मी नेहमी ठरवलेल्या माझ्या मार्गावर चालते आणि मी माझ्या शरीराबात अतिशय कम्फर्टेबल आहे. सुंदरता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असते”, असे नोरा फतेही म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-“पुण्यात आता ‘मुळशी पॅटर्न’ नाही कर ‘कायद्याचा पॅटर्न’ चालणार”; अमितेश कुमारांचा गुंडांना इशारा
-एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेतील विकीचा नवा लूक पाहिला का?