पुणे : भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीच्या समारोपानंतर होणाऱ्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
“देशातील सर्वोत्तम शहर पुण्याला बनवण्याची संधी मला मिळत आहे. याचं मला समाधान आहे. मताधिक्य मिळणं किंवा निवडणूक जिंकणं यापेक्षा महत्वाचं आहे की, त्यानंतर मिळालेल्या जबाबदारीचं भान आतापासून आहे. प्रत्येक पुणेकर मतदारांची काहीतरी अपेक्षा आहे. आज पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांच्या अपेक्षा, कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार“, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
वंदन ग्रामदैवताला…
आपल्या पुण्यनगरीचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचं कुटुंबियांसमवेत आरती करुन दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. pic.twitter.com/OQvWVrBDgr
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) April 25, 2024
“वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक असताना ज्या त्या प्रभागात चांगली कामे केली आहेत. पण ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठा विचार करणार आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाला पाठवायचं आणि आपला माणूस कोण याचा विचार करणार आहेत. देशाचे प्रतिनिधित्व हे मोदीजीच करणार आहेत आणि पुणेकर निश्चितच महायुतीचा उमेदवार निवडून देतील”, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त
-‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील
-आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव; आरटीओमध्ये ‘काळाबाजार’