पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रचाराच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. सुनेत्रा पवार या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी मतदारांना विश्वास दिला आहे.
“मी शेतकऱ्यांची मुलगी आणि शेतकऱ्यांचीच बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन”, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रूपाली चाकणकर, राहुल कुल, कांचन कुल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार रमेश थोरात मैदानात उतरले आहेत.
मी शेतकऱ्याची लेक आहे आणि स्वतः शेतात राबलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडतानाच केंद्र शासनाच्या निधी व विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांसह तमाम जनतेच्या हितासाठी जागरूक राहीन. जनसंपर्कासोबत राज्य व केंद्र शासनाचा दुवा होऊन विकासाला चालना देईन, असे प्रतिपादन
कुरकुंभ… pic.twitter.com/rO8jrlNh0S— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 24, 2024
“ही निवडणूक कौटुंबिक नाही. ही देशाची निवडणूक आहे. उज्ज्वल भारतासाठी आपण एकत्र आलो आहोत.मी शेतकऱ्यांची मुलगी आणि बायको आहे. मला शेतीचे प्रश्न जवळून माहिती आहे. विकास करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे आहेमला पाठींबा द्यावा अशी विनंती करते.येणाऱ्या काळातील जबाबदारी पार पाडेल अशी खात्री देते”, असाही विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघात रावणगाव येथे रावणगावसह मळद, नंददेवी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. महायुतीच्या माध्यमातून नेतेमंडळींची झालेली एकजूट पाहून येथील वातावरण उत्साही होते. त्याच उत्साहाने “घड्याळा”ला मतदान करून महायुतीला मताधिक्य देण्याची ग्वाही येथील पदाधिकारी,… pic.twitter.com/k087Lxd7Cy
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 24, 2024
सुनेत्रा पवार या दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांचा अडचणीत लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला आहे. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त
-‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील
-आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव; आरटीओमध्ये ‘काळाबाजार’
-राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा
-…म्हणून पंतप्रधान मोदींची सभा एस. पी. मैदानावर नाही तर शहरातील ‘या’ मैदानावर होणार