पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. तसेच बारामतीमध्ये पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याचंही पहायला मिळालं आहे. त्यातच २०२४ ही बारामती लोकसभा निवडणूक प्रचंड चुरशीशी बनली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी त्यांचे वडिल शरद पवार यंच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आहेच पण आता मनसे सुद्धा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतली आणि पुढील रणनीतीबद्दल चर्चा केली. बैठकीत चर्चा केली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघा विषयी चर्चा झाली.
‘बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुका स्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. तसेच राज ठाकरे यांची सभा ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी होणार आहे. या सभेची वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही. लवकरच सभेचं ठिकाणही ठरवलं जाईल’ अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीमधील निवडणूक लढण्यासाठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिल रोजी छाननी झाली. त्यामध्ये ५ अर्ज बाद करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून पंतप्रधान मोदींची सभा एस. पी. मैदानावर नाही तर शहरातील ‘या’ मैदानावर होणार
-ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश