पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो जाहीर करुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. अजित पवारांनी सांगूनही रुग्णालय प्रशासनाकडू या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ससून रुग्णालयामधील काही निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन गोंधळ घातला होता. त्यामध्ये अस्थिव्यंगोपचार विभागातील काही निवासी डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी मद्य पिऊन शेजारील निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. याप्रकरणी एका निवासी महिला डॉक्टरने तक्रार केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती नेमली. समितीने चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला होता.
याप्रकरणी कारवाई करण्यास रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस संचालनालयाने केली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने अद्यापपर्यंत कारवाई करणे टाळले आहे. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगूनही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे उघड झाले आहे.
मद्य पार्टी प्रकरणातील दोषी निवासी डॉक्टरांवर कारवाईबाबत विचारले असता ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मौन धारण केले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयालाच याबाबत विचारा, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. या प्रकरणातील निवासी डॉक्टरांवर अद्याप कारवाई झाली नाही, याला मार्डच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
-शिरूरमध्ये मनसे आढळराव पाटलांच्या साथीला! मनसे पाठिंब्याने ताकद वाढली
-मुरलीधर मोहोळांची प्रचारात आघाडी, सहाही मतदारसंघात पहिला राऊंड पूर्ण! नागरिकांचा मोठा प्रतिसाद