पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संभाजी कुंजीर हे अनेक वर्षांपासून राजकारणापासून दूर राहिले होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ते सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संभाजी कुंजीर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संभाजी कुंजीर राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील आजी- माजी सरपंच व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात पोचवून पुरंदर तालुक्याचा विकास करण्यासाठी मी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे संभाजी कुंजीर म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरूरमध्ये मनसे आढळराव पाटलांच्या साथीला! मनसे पाठिंब्याने ताकद वाढली
-मुरलीधर मोहोळांची प्रचारात आघाडी, सहाही मतदारसंघात पहिला राऊंड पूर्ण! नागरिकांचा मोठा प्रतिसाद
-“अजितदादांनी ‘त्या’ पाण्याबाबत दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही”- सुनेत्रा पवार
-‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा आमची वहिनीच भारी’; सुनेत्रा पवारांना शिवसेना महिला आघाडीचा पाठिंबा