पुणे : मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. ‘मनसैनिकांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली असून, राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे तरूणांची ताकद प्राप्त होणार’, असे आढळराव पाटील म्हणाले आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पार्श्वभूमीवर शिरूर व हवेली तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाघोली येथे झालेल्या नियोजन बैठकीत आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, उपाध्यक्ष महिबूब सय्यद, काका गायकवाड, किरण गव्हाणे, सविता दरेकर, ॲड. राहुल कदम, शिरूर तालुकाध्यक्ष तेजस यादव, अविनाश घोगरे, वींद्र गुळादे, हवेली तालुकाध्यक्ष चेतन चौधरी, शिरूर शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, सचिव रवीराज लेंडे, संतोष नरके, सुनिल दरेकर, धर्मा गावडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या नियोजन बैठकीत, आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने संपर्क मोहिम हाती घेण्यात आली असून, शिरूर – हवेलीत घर टू घर प्रचाराचे नियोजन करण्यात आल्याचे रामदास दरेकर यांनी सांगितले. मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीला बळ येणार असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी संसदेत प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. राज ठाकरे हे तरूणांच्या गळ्यातील ताईत असून, त्यांच्या पाठिंब्याचा महायुतीला मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्याशी मराठी तरूणांच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली असून, सरकारची याबाबतीतली ध्येयधोरणे पसंत पडल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला लाभत असल्यानेच ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनसेचे बाबू वागसकर यांनी दिली आहे.
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी आभार मानले. यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, माजी नगरसेवक शांताराम कटके, भाजप हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, शिरूर- हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक आदी यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांची प्रचारात आघाडी, सहाही मतदारसंघात पहिला राऊंड पूर्ण! नागरिकांचा मोठा प्रतिसाद
-“अजितदादांनी ‘त्या’ पाण्याबाबत दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही”- सुनेत्रा पवार
-‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा आमची वहिनीच भारी’; सुनेत्रा पवारांना शिवसेना महिला आघाडीचा पाठिंबा
-‘जय लहान आहे, माझ्या मुलासारखा’; सुप्रिया सुळेंचं जय पवारांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर
-‘आढळराव पाटलांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत’ मंचरच्या बैठकीत सूर