पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यातच आता सुनेत्रा पवार सोमवारपासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
“पुरंदर सारख्या पुण्यालगत वसलेल्या तालुक्यातील अनेक गावात समस्या आजही कायम आहेत. त्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे. यावेळी ग्रामस्थांनी आता तुमच्याकडून खूप आशा आहेत, असे सांगून त्यांचे प्रश्न मी मार्गी लावेन याबाबत विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द असून तो मी पाळणारच”, असेही पवार यांनी सांगितले आहे.
गुंजवणीच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्रश्ना सोबत इतर प्रश्र्नी केंद्र शासनाकडे ताकदीने प्रयत्न करेन, अशी ग्वाही कोळविहिरे इथे बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
गुंजवणीच्या पाण्यासोबत विविध प्रश्न मार्गी लावताना पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात आय. टी. पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात किंचितशीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही राख येथे बोलताना दिली.
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीची उमेदवार… pic.twitter.com/j7XBZuDu7W— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 23, 2024
“मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. त्या स्वभावाला स्मरून सांगतो, की महायुतीला पुरंदरमध्ये प्रचंड मताधिक्य मिळेलच शिवाय संपूर्ण लोकसभा मतदारसंघात घड्याळ विक्रमी मताधिक्याने विजयी होईल”, असं बाबाराजे जाधवराव म्हणाले आहेत.
माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी यावेळी बोलताना, पुरंदर आता नवीन पुणे होण्याच्या मार्गावर असून त्याला गती देण्यासाठी महायुतीला बळ द्यावे. आपलं नाणं खणखणीत असल्याने दिवसेंदिवस आपला विजय विक्रमी मताधिक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
-‘रामकृष्ण हरी, ताईपेक्षा आमची वहिनीच भारी’; सुनेत्रा पवारांना शिवसेना महिला आघाडीचा पाठिंबा
-‘जय लहान आहे, माझ्या मुलासारखा’; सुप्रिया सुळेंचं जय पवारांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर
-‘आढळराव पाटलांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत’ मंचरच्या बैठकीत सूर
-‘माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणारच’; रोहित पवारांनी उचलला बारणेंच्या पराभवाचा विडा
-पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग