पुणे : पुणे शहरातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडीगृहात आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्याची घटना समजताच अग्निशममन दलाच्या जवानांना १५ मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं आहे. केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती.
या आगीत खेळाच्या साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे धूराचे लोट उसळत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याचा मारा करत सुमारे १५ मिनिटातच आग आटोक्यात आणली. खेळाडू आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री केली. यावेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.
मुकुंदनगर येथे लागलेल्या आगीत गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीव्ही आणि कार्यालयातील अन्य वस्तूंचे नुकसान झाले. जिमनास्टिकचे साहित्य जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, सुनिल नाईकनवरे हनुमंत कोळी, शुभम करांडे, निलेश कदम तसेच जवान विनायक माळी, जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, आदींनी आग आटोक्यात आणली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हॉट फोटोशूट: प्राजक्ता माळीने शेअर केले दिलखेचक फोटोज; चाहत्यांनी पाडला लाईक्स, कमेंटचा पाऊस
-“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले