बारामती : लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होऊन गेली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपपाल्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार तर महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यातच सुप्रिया सुळेंना धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हही दिले आहेत. त्यातील एका निवडणूक चिन्हावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मिळालेलं चिन्ह हेच आणखी एका उमेदवाराला चिन्ह देण्यात आले आहे. यावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना देखील निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभेमध्ये २ उमेदवारांना एकसारखे दिसणारे आणि तुतारी नाव असणारे चिन्ह मिळाल्याने ऐन निवडणुकीत गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हॉट फोटोशूट: प्राजक्ता माळीने शेअर केले दिलखेचक फोटोज; चाहत्यांनी पाडला लाईक्स, कमेंटचा पाऊस
-“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले
-‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
-गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल