पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना होत आहे. दोन्ही उमेदवाराकडून मोठ्या सभांचे आयोजन टाळत मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर जोर देण्यात आला आहे. लौकी गावामध्ये प्रचारा दरम्यान नागरिकांशी बोलत असताना एका छोट्या चिमुकल्याने “वंदे मातरम! Best Lucky आजोबा…” म्हणत एक पत्र आढळराव पाटील यांना दिले. हे पत्र पाहून आपल्याला गहिवरून आले, अशी भावना यानंतर बोलताना आढळराव पाटील व्यक्त केली आहे.
झालं असं की, शिरूर मतदारसंघातील लौकी या गावातील भारतीय सैन्यात असणारे सुधीर पंढरीनाथ थोरात यांना वीरमरण आले होते. कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामध्ये कर्तव्य म्हणून आढळराव पाटील यांनी हुतात्मा जवान पाटील यांच्या छोट्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आज लौकी येथे प्रचाराच्या निमित्ताने गेल्यावर लहानग्या यश सुधीर थोरात आणि त्याच्या आईने आढळराव पाटील यांना शुभेच्छा संदेश दिला. त्यावर “वंदे मातरम! Best Lucky आजोबा…” असे लिहिण्यात आलं होत.
दरम्यान, “हे शुभेच्छा पत्र पाहून आपले मन गहिवरून आले माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहते”, अशी भावना आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. तर “दादा खरच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले, माझ्यावर माझ्या कुटुंबावर ज्यावेळी वेळ होती, त्या वेळी मला भावासारखा आधार दिला, हे मी कधी विसरू शकत नाही” अशी भावना वीर माता कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
-‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
-गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल
-‘५ वर्षापूर्वी माझी चूक झाली’ म्हणत शरद पवारांनी मागितली जाहीर माफी