पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी काल वाघोली दौरा केला. या दौऱ्यात आढळराव पाटलांनी नागरिकांच्या गाठीभेट घेत आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाघोलीमधील काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळरावाचं जंगी स्वागत केले. त्यानंतर आढळरावांनी नागरिकांशी संवाद साधत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली.
“पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत. १० वर्षापुर्वी वाघोली जेव्हा छोटी होती तेव्हा येथील पाण्यासाठी मनपाने एक योजना आखली होती. जीचा खर्च २५ कोटी होता. त्यापैकी निम्मा निधि मनपा देणार होती तर निम्मा खर्च वाघोली ग्रामपंचायतीला द्यावा लागणार होता. मी मंत्रालयात जाऊन यावर बोललो. मात्र खासदाराविना मतदारसंघ अशी मागच्या काही वर्षांपासून शिरुर मतदारसंघाची ओळख आहे. पुढे काय होणार?” असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
“पुणे शहरातील ड्रेनेजच्या समस्यांवर फक्त अजितदादा तोडगा काढू शकतात. त्याबाबत अजित पवार यांच्याकडे तशी विनंती केली आहे. याचबरोबर पुण्यातील ट्राफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नसतानाही तीनवेळी गडकरी यांची भेट घेतली आहे. असं म्हणत वाघोलीतील समस्या त्याचवेळी सुटतील जेव्हा लोकांनी लोकांत मिसळणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे” असेही आढळराव पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, वाघोलीतील सवाना सोसायटीला आढळरावांनी भेट दिला. यावेळी राजकीय मतभेद विसरून तुमच्यासारखा सामाजिक जाण असणारा नेता ही निवडणुक लढतोय अशी भावना तेथील लोकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना पुर्वी रेल्वे सुट मिळत होती. ते सुरू करण्याची विनंती इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आढळरावांकडे करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
-‘५ वर्षापूर्वी माझी चूक झाली’ म्हणत शरद पवारांनी मागितली जाहीर माफी
-‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ म्हणत नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक
-“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार
-काँग्रेसमध्ये वादाची मालिका सुरूच, बागुलांच्या विरोधात झळकवले बॅनर; धंगेकरांना डोकेदुखी