पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर यांसह महाविकास आघाडीचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते.
अमरावतीमध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच अमरावतीच्या खासदार आणि महायुतीच्या आताच्या उमदेवार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली आहे. शरद पवरांनी आपली चूक झाली असल्याचं वक्तव्य केलं आहे.
“मी इथे आलोय तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की, माझ्याकडून एक चूक झाली. ५ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना अमरावतीकरांनी खासदार केलं. ५ वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“देशातली सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे. गेली १० वर्षं आपण बघतोय. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतोय. काय सांगतात ते हल्ली? जवाहरलाल नेहरूंनंतरच्या सर्व पंतप्रधानांच्या कामाची पद्धत आम्ही पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्या जायचं, भाषणं करायची, त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल, यासाठी लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा संदेश या सर्व राज्यकर्त्यांनी दिला. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात”, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ म्हणत नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक
-“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार
-काँग्रेसमध्ये वादाची मालिका सुरूच, बागुलांच्या विरोधात झळकवले बॅनर; धंगेकरांना डोकेदुखी
-जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज