पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शहरातील खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ येतो. खडकवासल्यातून मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. रविवारी महायुतीचे खडकवासल्यातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना अजित पवारांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मताधिक्य वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ‘एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गृहसंकुलांची माहिती महायुतीकडून संकलित करण्यात आली असून येथील समस्या सोडविल्या जातील, असा ‘शब्द’ नागरिकांना द्या”, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.
‘बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला परिसरात १२६४ च्या आसपास गृहसंकुले आहेत. यातील काही सोसायट्यांमध्ये पाच-पाच हजार सदनिका आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन आणि आखणी करावी. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न अशा सुटणाऱ्या समस्या या भागात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. त्यामुळे प्रचाराला जाताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा ‘शब्द’ नागरिकांना द्यावा’, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ म्हणत नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक
-“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार
-काँग्रेसमध्ये वादाची मालिका सुरूच, बागुलांच्या विरोधात झळकवले बॅनर; धंगेकरांना डोकेदुखी
-जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज