पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर येत्या शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण ५२२ उमेदवारी अर्ज आले आहेत. यापैकी ३१७ अर्ज निवडणूक आयोगाकडून वैध ठरवण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यातच तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदारंसघातील २१, बारामती मतदारसंघातील ४६, उस्मनाबाद मतदारसंघातील ३५ लातूर मतदारसंघातील ३१ आणि सोलापूर मतदारसंघातील ३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जाच्या मतदारसंघापैकी सर्वात कमी रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातील उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातील केवळ ९ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज हे बारामती मतदारसंघातून वैध ठरले आहेत. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, धारशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही
-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”
-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव
-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका
-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच