पुणे : पुणे शहरातील रविवार पेठेतील भोरी आळी रामसुख चेंबर्स येथे पहाटे ५: १० वाजता मोठी आग लागली. ६८८ रविवार पेठेतील भोरी आळीतील लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकूण ४ फायरगाड्या आणि १ वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता. वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी आगीचे नेमके कारण समोल आले नसून सदर ठिकाणी सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असून आग इतरत्र पसरु नये याची दक्षता घेत जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी धुराचे प्रमाण मोठे असल्याने दलाकडून एक्झॉस्ट ब्लोअरच (धूर बाहेर काढण्याचे यंत्र) वापर करुन आजुबाजूला असणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
सदर व्यावसायिक इमारत ही तळमजला अधिक ४ मजले असून या संपुर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. या आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”
-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव
-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका
-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच
-ठरलं तर! पुण्यात मोहोळांसाठी घुमणार मोदींचा आवाज! “या” तारखेला होणार जंगी सभा