पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ ही राज्यात सर्वात प्रतिष्ठेची बनली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निवडणुकीकडे लागून आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक वक्तव्यं केली आहेत.
या मुलाखतीत अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि तुमच्यातील जुनं नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “एकदा ७ तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा”, असे अजित पवार यांनी सांगितले.
“निवडणुकीत या भावनिक नातं चालत नाही. ७ मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही, असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येईल. बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे.”
दरम्यान, अजित पवारांनी ही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील जुनं नातं पुन्हा पूर्ववत होणार का? काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं देखील महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव
-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका
-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच
-ठरलं तर! पुण्यात मोहोळांसाठी घुमणार मोदींचा आवाज! “या” तारखेला होणार जंगी सभा
-‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला