पुणे : लग्न म्हणजे प्रत्येक जोडीदाराच्या आयुष्यभराचा प्रश्न असतो. अलिकडील काळात फसवून लग्न केल्याच्या घटना खूप घडत आहेत. आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला नाही तर लग्न या गोष्टीवरुन विश्वास उडून जातो. पुणे शहरातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर आपली पती हा ‘गे’ असल्याची माहिती पत्नीला समजली अन् तिला धक्काच बसला.
पती गे असल्याचं समजलं तरीही २ वर्षे कसाबसा संसार केल्यानंतर देखील सासरच्या व्यक्तींनी तिला त्रास द्यायला सुरवात केली आहे. शेवटी पिडीत महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते १७ एप्रिलपर्यंत घडला आहे.
याप्रकरणी ३३ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला मुंढवा परिसरात राहण्यास आहे. तिचा ३० वर्षीय पती, ६४ वर्षीय सासू, ४० वर्षीय नणंदेविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वानवडी येथील एका आलीशान सोसायटीत घडला.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न जानेवारी २०२२ मध्ये झाले होते. तिचे सासर कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यात आहे. लग्न करीत असताना महिलेपासून त्यांचा पती ‘गे’ असून त्याला पुरुषांमध्ये रस असल्याची माहिती लपवून ठेवण्यात आली. तसेच त्याची समाजात ‘गे’ म्हणून ओळख निर्माण होऊन बदनामी होऊ नये याकरिता फिर्यादीसोबत लग्नाचे नाटक केले.
यासोबतच या महिलेला घरातील सर्व कौटुंबिक खर्च करायला भाग पाडले. आरोपी पतीने त्याच्या आईचा देखील खर्च करण्यास भाग पाडले. या महिलेला शरीरसुखापासून वंचित ठेवल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका
-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच
-ठरलं तर! पुण्यात मोहोळांसाठी घुमणार मोदींचा आवाज! “या” तारखेला होणार जंगी सभा
-‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
-“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील